अमळनेर ( प्रतिनिधी ) – शहरातील भाजीपाला मार्केटमधील हॉटेल मधून एकूण पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी शनिवारी १५ जुलै रोजी दुपारी ४ वाजता अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर शहरातील भाजीपाला मार्केट परिसरात हॉटेल पायल आहे. या ठिकाणी या दुकानात सिगारेट विदेशी दारू ठेवलेल्या आहेत. दरम्यान १४ जुलै रात्री ११ ते १५ जुलै सकाळी १० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने हॉटेलमधील किचन रूमचा छताचा लोखंडी पत्रा कटरने कापून आत प्रवेश करत सिगरेट पाकीट, विदेशी दारूच्या बाटल्या आणि रोकड असा एकूण २५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी हॉटेल मॅनेजर चंदन नानेकराम चौक (वय-५०) रा. अमळनेर यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रामकृष्ण कुमावत करीत आहे.