अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील मुख्य चौकात भरधाव वेगाने दुचाकी चालवून समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला धडक दिल्याने एकाचा पाय फ्रॅक्चर होवून तो जबर जखमी झाला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपाळ वसंत पाटील (वय ४८ रा. कलाली) हे दुचाकीने शहरातील भागवत रोडकडे जात असताना मुख्य चौकात समोरून भरधाव येणाऱ्या दुचाकी क्रमांक जीजे ०५ एचके १८१८ वरील चालकाने जोरदार धडक दिल्याने दोघे रस्त्यावर पडले. सदर दुचाकीस्वार वाहन उचलून पळून गेला. मात्र गोपाळ पाटील यांच्या उजव्या पायाला गुडघ्यापासून खाली फ्रॅक्चर, उजवा खांदा व बरगड्यांना मुका मार लागल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोपाल पाटील यांनी दवाखान्यात दिलेल्या जबाबावरून सदर अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास हेकॉ अशोक साळुंखे करीत आहेत.