तलाठ्यांनी केला पंचनामा, ३५ हजारांचे नुकसान
अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील कसाली मोहल्ला येथे वादळ आणि पाऊस आल्याने घर कोसळून महिला व मुलगी जखमी झाल्याची घटना दि. २८ रोजी सायंकाळी घडली आहे. याप्रकरणी तलाठी सोनवणे यांनी पंचनामा केला आहे.
फिरोज खा शमशेर खा पठाण यांची पत्नी सायंकाळी स्वयंपाक करत होती. वादळ व पाऊसमुळे अचानक घर कोसळले. धाब्याची माती व लाकडे कोसळल्याने स्वयंपाकचे गरम पाणी पडून मुलीचा हात भाजून दुखापत झाली आहे. घरातील वस्तूंचे नुकसान झाले. जखमी मुलगी मुस्कानबी फिरोज खा (वय ९) हिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घरातील वस्तू व इतर मिळून सुमारे ३५ हजाराचे नुकसान झाले आहे. शहर तलाठी सोनवणे यांनी पंचनामा केला.