अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील मुंदडा नगर, संत सखाराम नगर येथील दोन बंद घर फोडून सोन्याचे व चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि दुचाकी असा एकुण २ लाख २४ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवारी १२ जून रोजी सकाळी उघडकीला आले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
मुंदडा नगरात राहणारे नरेंद्र प्रकाश सुर्यवंशी (वय-३९) हे शेतकरी असून शेतीचे काम करून ते उदरनिर्वाह करतात. दि. ११ जून रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे पुढील दरवाजा तोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने व रोकड असा एकुण ६९ हजार २०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार बुधवारी दि. १२ जून रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आला. तर दुसऱ्या घटनेत शहरातील संत सखाराम नगरात राहणारे हुकुमचंद शांताराम पाटील यांच्या घरातून देखील रोकड, सोन्याचे व चांदीचे दागिने आणि दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीएन ८२) असा १ लाख ५५ हजारांचा ऐवज चोरून नेला.
या दोन्ही घटनेत एकुण एकुण २ लाख २४ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे १२ जून रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आले. याप्रकरणी दोन्ही घर मालकांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार अमळनेर पोलीस ठाण्यात सायंकाळी ६ वाजता वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे व पोहेकॉ संताष पवार हे करीत आहे.