जळगाव (प्रतिनिधी) :- येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तथा प्रसिद्ध वकील अड. कुणाल पवार यांची जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेवर स्वीकृत संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र नुकतेच प्रभारी मानद सचिव वीरेंद्र भोईटे यांनी त्यांना दिले आहे.
त्यांच्या निवडीबद्दल संचालक मंडळातर्फे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेच्या एक्झिक्यूटिव्ह कमिटी मध्ये झालेल्या चर्चेनुसार सर्वानुमते अड. कुणाल पवार यांची जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेवर स्वीकृत संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे.