मोटरसायकलच्या धडकेत ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
चाळीसगाव : प्रतिनिधी — गायीचा बछडा घेऊन पायी जात असलेल्या ३९ वर्षीय व्यक्तीला भरधाव मोटरसायकलने धडक दिल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. चाळीसगाव तालुक्यातील आंबेहोळ (लोंजे) येथील विजय सुकलाल राठोड यांचा या अपघातात मृत्यू झाला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ९.१० वाजता विजय राठोड हे गायीचा बछडा घेऊन खडकीकडून आंबेहोळ गावाकडे पायी जात होते. त्यावेळी एमएच १९ डी.वाय. ८७९३ क्रमांकाच्या मोटरसायकलने त्यांना कोतगाव चौफुली फौजदार ढाब्यासमोर जोरदार धडक दिली.
या अपघातात विजय राठोड गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने २६ ऑगस्ट रोजी सकाळी ५.२२ वाजता त्यांना धुळे येथील हिरा मेडिकल कॉलेज येथे हलविण्यात आले.
मात्र, उपचार सुरू असताना डॉक्टर संगिता कुमारी पाचर यांनी तपासणी करून विजय राठोड यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक ९८/२०२६ अन्वये BNSS कलम १९४ प्रमाणे नोंद केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ/३०६ प्रशांत तुकाराम पाटील करीत आहेत.








