• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

ट्रकच्या भीषण धडकेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा करुण अंत; कावड यात्रादरम्यान घडली घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 24, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
ट्रकच्या भीषण धडकेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा करुण अंत; कावड यात्रादरम्यान घडली घटना

संतप्त जमावाने पेटवला ट्रक, ममुराबाद रस्त्यावर तणाव

​जळगाव (प्रतिनिधी) : शहरानजीकच्या ममुराबाद रस्त्यावरील प्रजापती नगराजवळ भरधाव ट्रकने ९ वर्षाच्या चिमुकल्याला चिरडल्याची अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. या भीषण अपघातात बालकाचा जागीच मृत्यू झाला असून, घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने अपघातग्रस्त ट्रक थेट पेटवून दिला.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/VID-20260824-WA0050.mp4

​मिळालेल्या माहितीनुसार, शनिपेठ परिसरातील गवळी वाड्यात राहणारा प्रबल राजू गवळी (वय ९) हा चिमुकला कावड यात्रेदरम्यान ममुराबाद रस्त्यावरील देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेला होता. दर्शन घेऊन मंदिराबाहेर पडत असतानाच भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. ट्रकच्या चाकाखाली आल्याने प्रबलचा जागीच करुण अंत झाला. अपघात घडल्यानंतर संतप्त जमावाने रस्त्यावर गोंधळ घालत थेट ट्रकला आग लावली. तसेच, घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीला पेटलेला ट्रक विझवण्यापासून रोखून धरले.​अपघातात ट्रक चालकही किरकोळ जखमी झाला असून, पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात हलवले आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/VID-20260824-WA0051.mp4

दरम्यान, संतप्त नागरिकांनी मृत बालकाचा मृतदेह रस्त्यावर ठेवून संबंधित ट्रक चालकाला तात्काळ घटनास्थळी आणून आमच्या ताब्यात द्या, अशी आक्रमक मागणी लावून धरली.
​घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनल्याने परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/VID-20260824-WA0052.mp4

पोलिसांनी संतप्त जमावाची समजूत काढली. ​दरम्यान, चिमुकल्या प्रबलचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) आणला असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. यावेळी त्याच्या नातेवाईकांनी केलेला हृदयद्रावक आक्रोश उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रबल गवळी याच्या पश्चात आई-वडील असा परिवार असून वडील मजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.

Previous Post

क्रुझरच्या धडकेत आयटीआयच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; दोघे जखमी

Next Post

शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू

शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
खान्देश

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

October 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!