जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली अल्पवयीन तरुणी बेपत्ता झाल्याप्रकरणी काकाने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात इसमाने पळवून नेल्याची फिर्याद त्यांनी दिली आहे.
शिरसोली गावात एका भागातील हे रहिवासी आहेत. याबाबत ४६ वर्षीय काकाने फिर्याद दिली आहे. बेपत्ता तरुणीचे वडील मयत असून आई शेतीकाम करून उदरनिर्वाह करते. दि. ८ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता अल्पवयीन पुतणी हि घरी नसल्याबाबत काका व त्यांच्या कुटुंबियांना लक्षात आले. तसेच आईसोबत देखील ती शेतात गेलेली नव्हती. त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र ती मिळून आलेली नाही.
त्यामुळे काकाने गुरुवारी ९ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध अल्पवयीन तरुणीला पळवून नेल्याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.