उप कार्यकारी अभियंता बागुल यांचे आश्वासनानंतर मागे
चंदकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील ऐनपूर येथील पुनर्वसन संघर्ष समितीच्या वतीने जलसमाधी आंदोलन येथील सुस्ती तापी नदी पात्रात करण्यात आले. या आंदोलनास उपअभियंता बागुल यांनी आंदोलनास भेट देवून त्याचे म्हणणे ऐकूनघेतले. त्यांना आश्वासन दिल्याने हे आंदोलन ६ तासानंतर मागे घेण्यात आले.
येथील पुनर्वसन संघर्ष समिती मागण्यांसाठी लढत आहे. गेल्या दहा वर्षा पासून राहिलेले घरे तसेच नविन २५० घरे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे तसेच संबंधित विभागास वेळोवेळी कागदपत्रे दिले असूनसुद्धा वरिष्ठ अधिकारी दखल घेत नसल्याने दि. ११ रोजी सुलवाडी येथील सुस्ती परीसरातील तापी बॅक वॉटरमध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आले. सकाळी ९ वाजता बसस्थानकावरील सरदार पटेल यांच्या पुतळयास हार घालून वाजत गाजत पुनर्वसन संघर्ष समितीने तापी नदीकडे मार्गक्रमण केले. त्याठिकाणी सर्व आंदोलकांनी पाण्यात उतरून आदोलन केले. यावेळी परिसरातील भांबलवाडी, वाघाडी, नेहता, ऐनपूरसह गावातील लोकानी सहभाग घेतला. जोपर्यत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यत आदोलन मागे न घेण्याच्या घोषणा देण्यात आल्या.
वरिष्ठांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या यावर ठाम राहिले. प्रशासनाच्या वतीने आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. परंतू ठोक आश्वासन मिळत नाही तोपर्यत आंदोलन मागे घेणार नाही असे आंदोलकानी म्हटले. अखेर उप कार्यकारी अभियता बागुल यानी आंदोलनास भेट देवून त्याचे म्हणणे ऐकून . आंदोलनकर्ते व मी स्वतः तुमच्या सोबत मंत्र्यालयात येतो आणि त्या ठिकाणी मंत्रीसोबत बैठक लावून आपला पूर्नवसनाचा मार्ग मोकळा करू असे लेखी आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी रावेर तहसिलदार बंडू कापसे, ऐनपूर मंडळ अधिकारी गजेद्र शेलकर, तलाठी शरद सूर्यवशी, कोतवाल नयना अवसरमल, खिर्डी सर्कल प्रविण नेहेते, बलवाडी तलाठी अश्वीनी हंडे, काडवेल तलाठी शाम तिडके, कोतवाल तुषार पाटील, ऐनपूर ग्रामविकास अधिकारी सुनिल गोसावी यासह अधिकारी उपस्थित होते. तर निभोरा पोलिस स्टेशनचे स.पो.नि. हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक सावळे आदी पोलिस कर्मचारी यानी चोख बंदोबस्त ठेवला. ठेवला
आंदोलक बेशुद्ध
यावेळी पाण्यात तोल गेल्याने एक आंदोलक बेशुद्ध झाला. तापी नदी पात्रात आंदोलन करीत असतांनाच शेख राजू शेख सुभान यांचा पाण्यात तोल गेल्याने त्यांच्या नाक व तोंडात पाणी गेल्याने तो बेशुद्ध पडला. आंदोलक यांच्या लक्षात येताच त्यांना त्वरीत बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन परदेशी यांच्या प्रयत्नामुळे मोठा अनर्थ टळला. ग्रामपंचायत सदस्य शेख शफी शेख रशीद, शेख हारुन जलील खा,न शेख आक्रम यांनी रुग्णवाहीकेतून नेऊन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ते पुढील उपचार घेत आहेत