जळगाव (प्रतिनिधी) – मेहरूण परिसरातील विश्वकर्मा नगरात एका गोडाऊनला रविवारी रात्री पवणे दहा वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. तब्बल अर्ध्या तासापासून ही आग सुरू असून अग्निशमन बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार विश्वकर्मा नगरात महादेवाचे मंदिर असून या मंदिराच्या मागील बाजूस गिताई टेन्ट हाऊस हे अनेक वर्षांपासून गोडाऊन बंद आहे. या गोडाऊनमध्ये चारा, गव-या तसेच अनेक भंगार वस्तू होत्या त्याला अचानक आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले महापौर जयश्री महाजन यांनी या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ अग्निशमन विभागाला फोन केला. अग्निशमन विभागाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले आतापर्यंत चार बंबाद्वारे आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या गोडाऊनच्या बाजूला काही दुकानेही हाेती मात्र अग्निशमन बंब वेळीच दाखल होऊन आग आटोक्यात आल्याने कुठलेही नुकसान झालेले नाही. दरम्यान आगीचे कारण कळू शकलेले नाही घटनास्थळावर नागरिकांची एकच गर्दी झाली आहे. एमआयडीसी पोलिसांचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल आहे. अग्निशमन विभागचे वाहन चालक संतोष तायडे, जगदीश साळुंखे सरदार पाटील, गोलानी मुख्यालय वाहन चालक नासिर अली, रोहिदास चौधरी, पन्नालाल सोनवणे ,राजेंद्र चौधरी, परमेश्वर सोनवणे, निवांत इंगळे वाहन चालक ,सोपान जाधव , राजमल पाटील प्रकाश कुमावत, मदन जराळ, प्रकाश सपकाळे,नितीन बारी घटनास्थळी दाखल आहे