जळगाव तालुक्यात भादली रस्त्यावर सोमाणी कंपनीत घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील असोदा ते भादली दरम्यान असलेल्या सोमाणी कॉटन कंपनीत रविवारी दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. जळगाव अग्निशमन दलाने हि आग शर्थीचे प्रयत्न करून आटोक्यात आणली. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आग लागण्याचे कारण समजू शकले नाही.
जळगाव तालुक्यात भादली रस्त्यावर सोमाणी कॉटन कंपनी आहे. या कापसापासून धागा तयार केला जातो. धागा तयार करण्याच्या मशिनीत वेस्ट मटेरियल एका बाजूला झिंगीमध्ये (आउटलेट) जमा होते.(केएफएन)त्याच्याजवळ असलेल्या टॅन्कमध्ये सकाळी ६ वाजेच्या सुमारास आग लागली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. अतिशय कोपऱ्यातील भागात आग लागल्याने पाणी मारायला कर्मचाऱ्यांना सुरुवातीला जमले नाही.
मात्र मशिनीतील छिद्रातून पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगीला ऑक्सिजन मिळाल्यावर ती पुन्हा भडकत होती. त्यामुळे शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन कर्मचाऱ्यांनी हि आग आटोक्यात आणली आहे.(केएफएन)एकूण ६ बंबांनी हे प्रयत्न केले. महापालीकेचे अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी यांचे मार्गदर्शनाखाली देविदास सुरवाडे, रोहिदास चौधरी, विजू पाटील, नंदकिशोर खडके, प्रकाश कुमावत, रवि बोरसे, निलेश सुर्वे आदींनी आग नियंत्रणात आणली.