मुंबईत इमारतीला भीषण आग : ७ जण ठार
मुंबई (वृत्तसंस्था ) – मुंबईतील एका 20 मजली इमारतीला शनिवारी सकाळी आग लागली. या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला. जीव गमावलेल्यांपैकी दोघे वृद्ध आहेत. याव्यतिरिक्त 19 जण भाजले आहेत. त्यापैकी 6 वृद्ध आहेत. ताडदेव परिसरातील कमला सोसायटी या इमारतीच्या 19 व्या मजल्यावर ही आग लागली.
सुमारे 5 तासांच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नायर हॉस्पिटलमध्ये 5, कस्तुरबा हॉस्पिटल आणि भाटिया हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या घटनेत जीव गमावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना 5 लाखांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे.