शिरसोलीत बारी विद्यालयात संस्थाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी केला सन्मान
शिरसोली (वार्ताहर) : माध्यमिक शिक्षण मंडळ, शिरसोली संचलित बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत असलेले विद्यार्थी प्रिय क्रीडाशिक्षक संजय काटोले यांना जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला.
सदर जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याने संस्थेचे अध्यक्ष अशोक अस्वार, उपाध्यक्ष दिलीप बारी, सचिव सुरेश अस्वार, शालेय समितीचे चेअरमन कमलाकर तांदळे, संचालक प्रवीण पाटील, मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर, पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील, विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.