समाजबांधवांचा मोठा सहभाग
जामनेर (प्रतिनिधी) : येथे नगरपालिका चौक ते तहसील कार्यालयपर्यंत आदिवासी समाज बांधवांनी निषेध मोर्चा काढला. दि ११ रोजी जामनेर तालुक्यातील मौजे चिंचखेडा बु!ता. जामनेर या ठिकाणी ६ वर्षच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी दिनांक १३ जून रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
संशयित आरोपीला त्वरित अटक करावी व फास्टट्रॅक कोर्टात याचिका दाखल करून आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी ही प्रमुख मागणी करण्यात आली.
या वेळी मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते. तृतीय पंथीय बांधवांनीही या मोर्च्यात सहभाग नोंदवला. निवेदन जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्याकडे देण्यात आले.
तसेच घटनास्थळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन आरोपीवर कठोरात कठोर शिक्षा करण्यात येईल ही ग्वाही दिली. या वेळी ना. गिरीश महाजन, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, पोलीस निरीक्षक किरण शिंदे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.