जळगाव (प्रतिनिधी) – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कार्यकर्ते १ जुलै पासून “परिषद की पाठशाल” उपक्रम राबवीत आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून जळगाव मधील पाच वस्त्यांवर जाऊन विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षणासह खेळ शिकविले जातात या उपक्रमाला नुकतीच पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे व सहकार भारती चे राष्ट्रीय संघटन मंत्री संजय जी पाचपोर यांनी कांचन नगरात भेट दिली.
दोघे मान्यवरांनी विद्यार्थ्याशी गप्पागोष्टी,विविध विषयांवर चर्चा खेळ घेतले, गाणे कविता उत्सववर्धक गीत घेत तसेच मुलांना बंदूक दुरून दाखवत काही मुलांना हातात देऊन त्यांच्या भविष्य विषयी विचारणा केली.आसता एकूण संख्येच्या मोठ्या 50% विद्यार्थी आर्मी व पोलीस होण्याची इच्छा प्रगट केली. सर्वांना शुभेच्छा देत कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. तसेच संजय पाचपोर व प्रवीण मुंडे यांच्या हस्ते सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.आणि वृक्ष लागवड हि करण्यात आली.या वेळी अभाविप प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे उपस्थित होते. परिषद की पाठशाला उत्साही वातावरणात चालवण्यासाठी भाग्यश्री कोळी, कार्यक्रम प्रमुक प्रमुख रितेश महाजन, चंद्रकांत पाटील, पवन भाई,पौर्णिमा देशमुख, चिराग तायडे व आदी कार्यकर्त्यांनी प्रयत्नपूर्वक कार्यक्रम राबवीत आहेत.