सातारा ;- जिल्ह्यातील ९९ जणांचे करोना रिपोर्ट निगेटिव्ह आले असून १३ जणांना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.
सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील ३ व कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील ९६ अशा एकूण ९९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.
10 मे रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात १३ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.