नवी दिल्ली – केंद्र सरकार ८० कोटी लोकांना गहू २ रुपये तर तांदूळ ३ रुपये किलोने देणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
सरकारी संस्थांमध्ये जे कंत्राटी कामगार आहेत त्यांनाही पगार दिला जाईल. खासगी कंपन्या यासाठी सकारात्मक आहेत. असंही जावडेकर यांनी स्पष्ट केले. १३० कोटी जनतेच्या सुरक्षेसाठी लॉकडाउन आवश्यक आहे. कोरोनाशी लढण्यासाठी तीन ते चारच उपाय आहेत. घरातच थांबा, काहीही काम केले की हात धुवा, ताप, सर्दी, खोकला वाढला तर लगेच डॉक्टरांकडे जा. सोशल डिस्टसिंग हे मोजकेच उपाय आहेत. ते सगळ्यांनी अवलंबावेत. आवश्यक सेवांची दुकानं बंद होणार नाहीत. दूध, किराणा, रेशन, मांस, पशूचारा, भाजीपाला दुकाने सुरु राहणार आहेत, असेही जावडेकर यांनी स्पष्ट केले.