पुढील अनर्थ टळला; आगीचे कारण अस्पष्ट
जळगाव ;- येथील खोटेनगर येथे असलेल्या वाटिकाश्रम येथे मोकळ्या जागेतील झाडाझुडपांना आज दुपारी २ वाजेच्या सुमारास आग लागली. मात्र वेळीच मनपाचे अग्निशामक बंबाने आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला .
मनपा अग्निशामक दलाचे कर्मचारी प्रकाश चव्हाण,गंगाधर कोळी,राजमल पाटील,नितीन बारी आदीं कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी आग उन्हामुळे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.








