जळगाव ;- अखिल भारतीय मारवाडी महिला मंडळातर्फे नुकतिच दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हातभार लाभणार आहे.
अखिल भारतीय मारवाडी महिला मंडळ भुसावळतर्फे देशभरात म्युझिक क्लबद्वारे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यात भजनसंध्यासह अन्य कार्यक्रमांचा समावेश असतो. कुटुंबातील मंगल कार्यक्रमात होणाऱ्या या कार्यक्रमांद्वारे महिला मंडळ निधी संकलन करते. संकलित झालेल्या निधीतून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून महिला मंडळाने दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली. अशाप्रकारे आजवर ५७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. मंडळाच्या जळगाव जिल्हाध्यक्षा भारती राठी, सचिव राजेश्री कात्यायनी, उपाध्यक्षा सपना नाहाटा, मंडळ अध्यक्षा वर्षा जैन, वीणा जैन, कामिनी जैन, नेहा मंत्री, निशा मंत्री, कल्पना मंडोरे, मंडळ सचिव सुनिता चांडक, सजन टाक, अनिता सांखला, स्नेहा लढ्ढा, जयश्री भराडिया, हेमा बेहरा, निलम जैन, विमल झंवर यांचे सहकार्य लाभले. मंडळातर्फे पाच वर्षांपासून हा उपक्रम सुरू अाहे.