पारोळा : तालुक्यातील तामसवाडी येथील एका ३७ वर्षीय महिलेच्या पोटात दुखू लागल्याने तिचा उपचारादरम्यान धुळे येथे मृत्यू झाला. याबाबत संगीता राजेंद्र लिंडायत (३७) यांचे दि. २६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पोटात दुखू लागल्याने त्यांना प्रथम तामसवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारसाठी धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले होते. त्यांचा उपचारादरम्यान दि. २७ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता मृत्यू झाला. याबाबत राजेंद्र दौलत लिंडायत यांच्या खबरीवरून आज दि. १४ मार्च रोजी पारोळा पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.