जळगाव ;- जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या फिल्टर प्लाण्टला भेट देऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी तुरटी क्लोरीन गॅस , ब्लिचिंग पावडर पाण्यामध्ये टाकून आले आढळून आले नाही . तसेच पाणीपुरवठा अधिकारी हे नॉन टेक्निकल असून त्यांची पोस्टिंग सिव्हिल वर्क म्हणून आहे . मनपाने केमिस्ट अधिकाऱ्याची नियुक्ती करायला हवी होत्री पण ती करण्यात आली नसून ५ लाखांच्या नागिरीकांच्या आरोग्याचा विचार करून आयुक्त यांनी तुरटी क्लोरीन गॅस , ब्लिचिंग पावडर व्यवस्था करून पाणी पुरवठा केमिस्ट अधिकाऱ्यांची तात्काळ नेमणूक करावी अशी मागणी गजानन मालपुरे ,संजय कोल्हे, नितीन जावळे, प्रसाद घोरपडे , चेतन शिरसाळे ,मंगला बारी ,ईश्वर नाईक , मनीषा पाटील, निलेश पाटील आदींनी दूषित पाण्याच्या बाटल्या देऊन केली .