जोधपूर – राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. ट्रॉले आणि बोलेरोच्या धडकेत एकाच कुटुंबातील 11 लोकांची मृत्यू झाला तर 3 जण गंभीररित्या जखमी आहेत. शेरगड भागात हा अपघात झाला. धडकेनंतर बोलेरो कार ट्रॉलेच्या खाली दबली होती. हे कुटुंब नवविवाहित जोडप्याला बालोतराहून रामदेवरा दर्शनासाठी घेऊन जात होते. या जोडप्याचे लग्न 16 दिवसांपूर्वी 27 फेब्रवारी रोजी झाले होते.
मृतांमध्ये 4 पुरुष, 6 महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. या सर्वांचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला. तर जखमींना जोधपुरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.