जळगांव ;- येथील राष्ट्रीय हरित सेना व प्रविण पाटील फाऊंडेशन यांच्या मार्फत वृत्तपत्र विक्रेता बाधवांना कोरोना या आजाराचा प्रार्दुभाव होऊ नये व आजारा पासुन संरक्षण व्हावे या उदेशाने विनोद महाजन यांच्या हस्ते संघटनेचे अध्यक्ष राजेद्र मुळीक यांच्या कडे मास्क वाटप करण्यासाठी देण्यात आले . या प्रसंगी नरेद्र नेरकर विनोद नेवे अनिल धनगर हे उपस्थीत होते या उपक्रमासाठी प्रविण पाटील विशाल पवार हरित सेना सदस्य सुनिल वाणी यांचे सहकार्य लाभले लवकरच वृत्तपत्र विक्रेते स्टॉल धारक बांधवांची आरोग्य तपासणी चेतना व्यसन मुक्ती केंद्रातर्फे करण्यात येणार आहे.