मुंबई;– विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी त्याचबरोबर भाजपने आपापले उमेदवारी जाहीर केले आहेत. कुणी जुन्या जाणच्या जाणत्या नेत्यांना संधी दिली आहे तर कुणी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यावरच आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे.

काँग्रेसकडून सचिन सावंत यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळेल, अशी शक्यता होती. त्यांचं नाव देखील संभाव्य उमेदवारांमध्ये आघाडीवर होतं. म्हणूनच सचिन सावंत यांच्यासारख्या आक्रमक, अभ्यासू पदाधिकार्याला संधी मिळेल असे वाटत होते. पण ती मिळाली नाही, असं खंत संजय राऊत यांनी व्यक्त केली होती.
सचिन सावंत यांच्याबरोबर विदर्भाचे अतुल लोंढे यांचेही नाव चर्चेत होते, पण कोणास फारसे माहीत नसलेले राजेश राठोड व पापा मोदी ही मराठवाड्यातील नावे समोर आली. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधान परिषद निवडणुकीच्या ‘पेल्यात’ थोडा खळखळाट झाला. मात्र आता काँग्रेस पक्षाने एकच उमेदवार रिंगणात ठेवल्याने निवडणुकीचा मार्ग सुकर झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला आणि परंपरेला अनुसरूनच हे घडत आहे, असं राऊत म्हणाले आहेत.







