नवी दिल्ली : देशामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आरोग्य विभागाने मंगळवारी दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशामध्ये १३३६ नवे रुग्ण आढळले आहेत तर ४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १८ हजार ६०१ वर पोहचला आहे. तर आतापर्यंत ५९० कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, वाढणारी हे संख्या चिंताजनक असल्याचेही म्हटले जात आहे
देशामध्ये आढळलेल्या १८ हजार ६०१ रुग्णांपैकी सध्या १४ हजार ७५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ३ हजार ५२२ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत ५९० रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील इतर राज्यांपैकी महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत ५ हजार ४७० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २३२ जणांचा मृत्यू झाला आहे.