भुसावळ : भुसावळातील राज्यस्तरीय धावपटू तसेच भुसावळ शहरातील अलायन्स मराठी चर्चचे सभासद डॅनिएल सुरेश पवार उर्फ बॉबी पवार यांना नाहाटा चौफुलीजवळ राज्य राखीव दलासह स्थानिक पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्याने त्यांचा एक हात व एक पाय फ्रॅक्चर झाला आहे. 24 रोजी सायंकाळी बॉबी पवार हे वाघूर धरणावरून परतत असताना नाहाटा चौफुलीजवळ जमावबंदीचे उल्लंघण केल्याने उभय पोलिसांनी कुठलीही सबब ऐकून न घेता मारहाण केल्याचा आरोप आहे.घरातील एकमेव कर्ता व्यक्ती असलेला बॉबी पवार यांना झालेल्या मारहाणीचा ख्रिस्ती समाजातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.