नागपूर । नागपुरातील 4 कोरोना संशयित रुग्णालयातून बेपत्ता झाले आहेत. नागपूरात कोरोना पोजिटिव्ह आलेल्या पहिल्या रुग्णाच्या संपर्कात आलेले हे 4 संशयित शासकीय मेयो रुग्णालयात दाखल होते. या चारही संशयितांचा अहवाल आज येणार आहे, त्यापूर्वीच हे चारही जण काल मध्यरात्री रुग्णालयातून बेपत्ता झाले आहेत. रुग्णालय प्रशासनाकडून पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.