जळगाव ;- रिपाइं जिल्हा सरचिटणीस मिलींद तायडे यांच्या वाढ दिवसा निमित्ताने जिल्हा सामान्य रुग्णालयात जेवणाची 170 पाकिटे वाटप करण्यात आली या वेळी रिपाइं रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष युवराज सोनवणे,युवा जिल्हा उपाध्यक्ष शंकर भोसले,ग्रामीण जळगांव तालुकाध्यक्ष प्रतिक सपकाळे, सामाजिक कार्यकर्ते पप्पू अडकमोल ,नरेंद्र सावळे,मुस्तफा तडवी,सुयोग पातुडे,आदी उपस्थित होते . वाढदिवसावर वायफळ खर्च न करता मिलिंद तायडे हे गेल्या दहा वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत गरीब गरजू रुग्णांना भोजनाची पाकिटे वाटपाचा कार्यक्रम घेत असतात . त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे .