मुंबई ;- ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी, आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे निधन. रविवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानं संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. गेले काही दिवस त्यांना थकवा जाणवत होता. चार दिवसांपूर्वी गोदरेज रुग्णालयात चेकअप साठी ॲडमिट केले असताना त्यांना करोनाची लागण झाल्याचं लक्षात आले. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. तिथेच त्यांचे निधन झाले.







