पाचोरा (प्रतिनिधी) – मा. आमदार दिलीप वाघ यांच्या दि. 22 ऑगस्ट रोजी वाढदिवसा निमित्ताने श्री सेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालय पाचोरा येथे 22 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट 2021 पर्यंत पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले असून शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आपले विचार मांडताना अपयश ही यशाची पहिली पायरी असते अपयश आल्याने खचून न जाता यशाला गवसणी घालण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी आणि प्रयत्नात सातत्य ठेवले तर एक दिवस यश आपल्या पायावर लोळण घेते जीवनामध्ये अपयश आल्याशिवाय उंच उडता येत नाही. त्यासाठी प्रयत्नांची कास करून सदैव प्रयत्न करत राहिले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या यशासाठी आणि उज्वल भविष्यासाठी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था सदैव विद्यार्थ्यांना प्रेरणा देत असते. याकरिता अशा शिबिरांचे आयोजन हे वेळोवेळी करण्यात येते असे विचार माजी आमदार दिलीप वाघ यांनी व्यक्त केले.व शिबीरास शुभेच्छा दिल्या यानंतर प्रा.राजेंद्र चिंचोले प्रा. डॉ. दिनेश तांदळे, भारत काकडे व नानासाहेब व्ही टी जोशी यांची भाषणे झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासाहेब जोशी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय ओंकार वाघ उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील विकास पाटील(पो.उ.नि)संस्थेचे संचालक खलील देशमुख, नानासाहेब देवरे प्रकाश एकनाथ पाटील प्रा.भागवत महालपुरे योगेश पाटील समवेत सतिष चौधरी वासुदेव महाजन हरून देशमुख शशीदादा चंदिले नितीन तावडे, विकास पाटील वासुदेव महाजन अशोक मोरे गोकुळ देवरे माजी प्राचार्य बी एन पाटील प्राचार्य एन एन गायकवाड उपप्राचार्य जी बी पाटील प्रा.राजेश मांडोळे संजय सूर्यवंशी प्रा. डॉ. गोपाळ प्रा.एस आर ठाकरे प्रा.डोंगरे प्रा.तडवी प्रा.पुरी प्रा.वळवी प्रा.देशमुख प्रा.नितीन पाटील प्रा. स्वप्नील ठाकरे प्रा. पी एन भागवत प्रा. महेश माळी प्रा. ललित पाटील श्री विजय पितांबर पाटील श्री नितीन पाटील ऋषिकेश ठाकूर आदी प्रा. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यालयीन अधिकारी वर्ग उपस्थित होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. वासुदेव वले यांनी प्रास्तविकात शिबीराची रूपरेषा सर्वासमोर मांडली या शिबीरात लेखी परिक्षे संबधी प्राचार्य वासुदेव वले प्रा.राजेंद्र चिंचोले श्री दिपक पाटील योगेश शिंपी नरेंद्र पाटील श्री कोळी सर (भडगाव) प्रा माणिक पाटील प्रा स्वप्नील भोसले तर मैदानी परीक्षे संबंधी एन आर ठाकरे सर प्रा.दिनेश तांदळे, सचिन भोसले, जी एन पाटील, प्रा गिरीष पाटील, महेश चिंचोले, संजय दत्तु आदी सर्वजन मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माणिक पाटील यांनी केले तर आभार प्रा.के एस इंगळे यांनी मानले.








