जळगाव ;-उन्हाळा आणि कोरोना परिस्थीतीत रक्ताचा तुडवडा भासत असून रोटरी परिवाराने यांत पुढाकार घेत लाईफ सेवर मेगा रक्तदान शिबिराचे आयोजन आज जळगाव शहरातील सर्व रोटरी व रोटरॅक्ट क्लब यांच्या सौजन्याने डॉ उल्हास पाटील मेडिकल कॉलेज रक्तपेढी यांच्या मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन आज करण्यात आले होते . .यावेळी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील ,डॉ. राजेश पाटील, सागर मुंदडा, रो. सुनिल सुखवानी ,रो. सुशील राका डॉ. राहुल मयूर,कॅप्टन मोहन कुलकर्णी , संजय दहाड ,डॉ. उशा शर्मा , विनोद पाटील , ऍड . जहांगीरदार आदी उपस्थित होते.


रोटरी क्लब जळगाव,रोटरी क्लब जळगाव वेस्ट,रोटरी क्लब जळगाव इस्ट,रोटरी क्लब जळगाव मिडडाउन,रोटरी क्लब जळगाव सेट्रल,रोटरी क्लब जळगाव गोल्डसिटी,रोटरी क्लब जळगाव स्टार,आणि ऑल रोटरॅक्ट क्लब जळगाव तर्फे डॉ उल्हास पाटील वैदयकिय महाविद्यालय रक्तपेढीच्या सयुक्त विदयमाने आज रविवार दि ३१ मे रोजी रोटरी भवन मायादेवी नगर जळगाव येथे सकाळी ९ ते १ लाईफ सेवर मेगा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. . या रक्तदान शिबिरात सर्व ७ रोटरी परिवारातील सदस्यांनी रक्तदान करून सर्वसामान्यांतर्फेही रक्तदान करण्यात आले .







