जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वावडदे महावितरणचे सबस्टेशन येथे आज सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी मुख्य अभियंता यांच्या समवेत वावडदा विभागाला भेट दिली.
मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी, जळगाव झोन, अधीक्षक अभियंता अनिल महाजन व वावडदा कक्ष कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता आकाश सोनवणे यांनी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान महाअभियान (पीएम कुसुम योजना) चे पाहणी केली. त्यावेळेस ग्रामीण उप विभागाचे उपकार्यकारी अभियंता विजय कापुरे व वावडदा कक्षाचे कर्मचारी संदीप अत्तरदे, दिनेश पाटील, जीवन रोकडे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.