पोलीस स्टेशनची कारवाई
पारोळा ( प्रतिनिधी ) – शहरातील नववसाहतीत राहत असलेल्या एका १७ वर्षीय युवकाकडून २ फूट ३ इंचाची धारदार तलवार पोलिसांनी जप्त केली आहे. शहरातील वसंत जिभाऊ नगर परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन युवकाजवळ तलवार असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांना मिळाली.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक बाळू गीते यांच्यासह पथकाने दिनांक ८ रोजी बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास चौकशी केली असता युवकाचा घरातून दोन फूट तीन इंचाची धारदार तलवार जप्त करण्यात आली. याबाबत पारोळा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.