बोदवड तालुक्यातील शेलवड गावातील घटना
बोदवड (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शेलवड गावातील शेतातील शेडमध्ये नासधूस केल्याचा जाब विचारल्यानंतर शेतकऱ्यासह त्याच्या आईवडिलांना मारहाण आणि कुऱ्हाडीने एकाला जखमी केल्याप्रकरणी तीन जणांवर बोदवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेलवड गावातील शेतकरी पिंटू चौधरी यांच्या शेतात शेड उभारले आहे. दि. ४ रोजी काही तरुणांनी शेडमध्ये नासधूस केली. त्यांना हटकले असता दीपक माळी, संतोष माळी आणि नगरसेविकेचे पती प्रीतेश जैन यांनी वाद घातला आणि मारहाण केली. त्यावेळी चौधरी यांच्या आई विमलबाई आणि वडील मुरलीधर चौधरी हे धावत आले. त्यावेळी संशयित आरोपींनी मुरलीधर यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला. त्यांना उपचारासाठी जळगाव येथे नेण्यात आले. त्यानंतर त्यांनी बोदवड पोलिसांत फिर्याद दाखल केली. आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.