कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते पूज्य साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख दीपक कुलकर्णी यांनी केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. विद्यार्थ्यांना साने गुरुजींबद्दल सखोल माहिती त्यांनी दिली. तसेच, साने गुरुजींचे गुण व संस्कार आत्मसात करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार घनश्याम काळे यांनी मानले. प्रसंगी नेत्रा वाणी उपस्थित होत्या.