पाचोरा (प्रतिनिधी) :- पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित गो.से .हायस्कूल पाचोरा येथील कलादालन येथे पोस्ट कार्ड डिझाईन स्पर्धा अंतर्गत “२०४७साली दिसणारा भारत” या विषयांतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विभागीय पाचोरा पोस्ट मास्टर सुधीर कोळी, असिस्टंट पोस्ट मास्टर अतुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून चित्रकला स्पर्धा यशस्वीरित्यासाठी मार्गदर्शित केले.
आपल्या मनोगतामध्ये पोस्ट ऑफिसचे सुधीर कोळी यांनी विद्यार्थ्यांना २०४७ मध्ये भारत कसा दिसेल किंवा कसा असेल यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून मार्गदर्शन केले. यानंतर विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी सांगितले. याप्रसंगी शाळेचे शाळेचे मुख्याध्यापक एन .आर .पाटील यांनी विद्यालयातर्फे त्यांचा सत्कार केला व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या प्रास्ताविकेत कलाशिक्षक सुबोध कांतायन, प्रमोद पाटील यांनी मार्गदर्शन केले. शाळेचे शिक्षक प्रीतमसिंग पाटील उपस्थित होते, कलाशिक्षक सुबोध कांतायन यांनी आभार मानले.