• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीला पत्नीने प्रियकराच्या मदतीने संपविले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 6, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीला पत्नीने प्रियकराच्या मदतीने संपविले !

अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील धक्कादायक घटना

पोलिसांचा यशस्वी तपास, दोघांना अटक

जळगाव (प्रतिनिधी) :- अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात तरुणाचा खून झाल्याची घटना शुक्रवारी दि. ६ डिसेंबर रोजी उघड झाली होती. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी ६ तासातच संबंधित घटना उघड करून यशस्वी तपास लावला आहे. हि घटना अनैतिक संबंधात अडथळा ठरत होता म्हणून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलीसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे फरार झालेला संशयित आरोपी प्रियकरासह मयताच्या पत्नीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

तुषार चिंधू चौधरी (वय ३७ रा.मारवड ता.अमळनेर ह.मु. प्रताप मिल, अमळनेर) असे मयत तरुण पतीचे नाव आहे. अमळनेर शहरातील प्रताप मिल परिसरात तुषार चौधरी हा तरूण पत्नी पुजा, २ मुलांसह वास्तव्याला होता. (केसीएन)गुरूवारी दि. ५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपासून तुषार हा त्याचा ओळखीचा असलेला सागर चौधरी यांच्यासोबत अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे गेले होते. त्यावेळी दोघांनी सोबत दारू पिली. दारूच्या नशेत दोघांमध्ये वाद झाला, यामध्ये दारूच्या नशेत सागर चौधरी याने तुषारच्या डोक्यात दोनवेळा दगड टाकून त्याचा निर्घृण खून करून पसार झाला होता.

दुसरीकडे रात्री उशिरापर्यंत तुषार हा घरी पोहोचलेला नव्हता. दरम्यान, शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता तुषारचा मृतदेह अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात आढळून आला.(केसीएन) या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. यात तुषार चौधरी याच्या डोक्यात गंभीर घाव असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलीसांनी चौकशीला सुरूवात केली. मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे संशयित आरोपी सागर चौधरी याला त्याच्या गावातून दोंडाईचाजवळच्या मालपूर येथून अटक केली. दरम्यान, हा खून अनैतिक संबंधातून केल्याची त्याने कबुली दिली.

त्यामुळे पोलीसांनी मयत तुषार चौधरी यांची पत्नी पूजा चौधरी हिलादेखील ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात मयत तरुणाचे चुलतभाऊ मधुकर धुडकु चौधरी (वय ५५, रा. मारवड) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर चौधरी (वय – ३५ रा.दोंडाईचा जि. धुळे) आणित पुजा तुषार चौधरी (रा. प्रताप मिल, अमळनेर)(केसीएन)असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोह कैलास शिंदे, मिलिंद सोनार, पोकॉ अमोल पाटील, पोकॉ निलेश मोरे, शेखर साळुंखे, प्रशांत पाटील, उज्वल म्हस्के, विनोद संदानशीव, जितेंद्र निकुंभे, नितीन कापडणे, होमगार्ड पूनम हटकर यांनी हि कारवाई केली आहे.

घटनेमागील इनसाईड स्टोरी

संशयित आरोपी पूजा तुषार चौधरी हिचे लग्नाआधीपासून नातेवाईक असलेल्या सागर चौधरी याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र पूजाच्या कुटुंबीयांनी तिचा विवाह तुषार चौधरी यांच्याशी लावून दिला. पुढे लग्नसंबंधातून त्यांना १ मुलगा, १ मुलगी झाले.(केसीएन) वर्षभरापूर्वी पूजा हिचे परत सागरशी ओळख झाली. त्यात त्यांच्या भेटीगाठी सुरु होऊंन अनैतिक संबंध देखील सुरु झाले. यात सागरने पूजासोबत पळून जाऊन लग्न करण्याचे ठरविले. हि गोष्ट सागरच्या पत्नीला माहित झाल्यावर त्यांच्यात वाद होऊन सागरची पत्नी हि माहेरी निघून गेली. तर दुसरीकडे मात्र याचा राग मनात धरून, सागर व पूजा यांनी तुषारला संपविण्याचा कट रचला.

गुरुवारी रात्री पूजाने पती तुषारला सागरची भेट घेऊन त्याला मदत करण्याविषयी सांगितले. त्यावेळी सागरने दारू आणि चिकन आणून व त्याचे आमिष तुषार याला दाखवित मंगरूळ येथील एमआयडीसी भागात नेले.(केसीएन)तेथे भरपूर दारू तुषारला पाजल्यावर संशयित आरोपी सागरने तुषारच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. त्यानंतर सागर हा त्याच्या मंगरूळ गावी निघून गेला. नंतर मोबाईल सीडीआर, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने केवळ ६ तासात तपास लावून संशयितांना अटक केली आहे. अमळनेर पोलिसांच्या अल्पकालावधीत यशस्वी तपासाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.


 

 

Previous Post

विवाहसोहळ्याच्या कार्यक्रमाला गेलेल्या घरात २३ लाखांचा ऐवज लांबविला !

Next Post

रक्तदान, नेत्ररोग तपासणी शिबिरात १०० नागरिकांनी घेतला लाभ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रक्तदान, नेत्ररोग तपासणी शिबिरात १०० नागरिकांनी घेतला लाभ

रक्तदान, नेत्ररोग तपासणी शिबिरात १०० नागरिकांनी घेतला लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावात घरकामाच्या मशीनची चोरी; रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 23, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामाबाहेरील १० सिलिंडर चोरीला

August 23, 2026
स्टिअरिंग रॉड जाम झाल्याने बस कठड्याला अडकली; चार प्रवासी किरकोळ जखमी
Uncategorized

स्टिअरिंग रॉड जाम झाल्याने बस कठड्याला अडकली; चार प्रवासी किरकोळ जखमी

August 23, 2026
८० फूट खोल विहिरीत शेतकऱ्याचा मृत्यू; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मृतदेह बाहेर
1xbet russia

८० फूट खोल विहिरीत शेतकऱ्याचा मृत्यू; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मृतदेह बाहेर

August 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

जळगावात घरकामाच्या मशीनची चोरी; रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 23, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामाबाहेरील १० सिलिंडर चोरीला

August 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon