जळगाव (प्रतिनिधी) : शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर उपस्थित होते.
तर प्रमुख अतिथी पर्यवेक्षिका सुरेखा दुबे ,ज्येष्ठ शिक्षक रामकृष्ण पाटील, सुनील भदाणे, सांस्कृतिक प्रमुख दीपक कुलकर्णी, आकांक्षा निकम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयातील शिक्षक चंद्रकांत कुमावत यांनी संविधानाबद्दलची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली. तर घनश्याम काळे यांनी उद्देशिकेचे वाचन केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक प्रमुख दीपक कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन देवका पाटील यांनी केले तर आभार सुनील ताडे यांनी मानले.