एरंडोलजवळ घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील एरंडोल ते जळगावकडून भरधाव वेगाने जाणाऱ्या सीमेंटच्या टँकरने महामार्गालगत असलेल्या आसारीच्या दुकानास जबर धडक दिली. या घटनेत टँकर चालक हा जागीच ठार झाला असून पायी चालणारा तरुण हा उपचारदरम्यान मयत झाला आहे. घटनेची एरंडोल पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर नाक्यानजीक असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील गतीरोधकाजवळ चालकाचे वेगावर नियंत्रण न राहिल्याने दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी भल्या पहाटे २ वाजेचे सुमारास सदर अपघात घडला. एम. एच. १५ जे सी १९९५ या क्रमांकाचा सिमेंटचा टँकर भरधाव वेगाने राष्ट्रीय महामार्गाने जात असताना गतिरोधकावर चालकाचा ताबा सुटल्याने थेट आसरीच्या दुकानात घुसला.(केसीएन)या दुर्घटनेत टँकर चालक फुलचंद (वय २६, रा. चिलूला ता. हैदरगड जि. बाराबंकी) हा जागीच ठार झाला. तर पादचारी शकील नबी बागवान (वय ३४, रा. एरंडोल) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शकील नबी बागवान हे एरंडोल येथील अँग्लो उर्दू हायस्कूलचे संचालक होते. ते त्यांच्या भावाच्या लग्नासाठी कपड्यांसह इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी आई सोबत मालेगाव येथे गेले होते. (केसीएन)तेथून ते व त्यांची आई लक्झरी बसने रात्री उशिरा एरंडोलला पोहचले. घरी परत जाताना रस्त्याच्या बाजूने पायी चालत असताना टँकरच्या मागील चाकात आला. त्यामुळे त्याचे दोघ पाय निकामी झाले.
दरम्यान, जळगाव येथे खासगी दवाखान्यात उपचार घेत असताना त्याचे निधन झाले. तर त्याची आई सुदैवाने बालबाल बचावली. घटनास्थळी सकाळी मोठा जनसमुदाय जमला. याबाबत एरंडोल पोलिस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तर नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणविरोधात संताप व्यक्त करत महामार्गावरील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले.