जळगाव शहरात तरुणाच्या आत्महत्येने खळबळ
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील अयोध्या नगर येथील रहिवासी तरुणाने राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि. २५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास उघड झाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
राजू प्रताप मिस्तरी (अंदूरकर, वय ४२, रा. कौतिक नगर, अयोध्या नगर परिसर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. ते मूळचे अहमदाबाद येथील आहे. राजू मिस्त्री हे पत्नी, १ मुलगा, १ मुलगी यांच्यासह राहत होते.(केसीएन) राजू हे फर्निचर काम करून तर त्यांची पत्नी घरकामे करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होती. दरम्यान, राजू मिस्तरी हे सोमवारी दुपारी शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) येथे छाती दुखते म्हणून उपचाराला गेले होते. तेथून घरी आल्यावर काही वेळानंतर त्यांच्या पत्नी घरकामासाठी घराबाहेर पडल्या. तेव्हा त्यांचा मुलगा घरी झोपलेला होता.
यावेळी घरी कोणी नसताना राजू मिस्तरी यांनी छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. काही वेळाने त्यांचा मुलगा झोपेतून उठला तेव्हा त्याला त्याचे वडील हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. (केसीएन)त्याने आरडाओरडा केल्यावर शेजाऱ्यांनी धाव घेत राजू मिस्तरी याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान, राजुने आत्महत्या का केली याचे कारण समजून आलेलं नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरु होते.