भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- विजेच्या खांबावर काम करताना शॉक लागून वायरमन जखमी झाल्याची घटना वरणगाव येथे घडली. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
रोशन निवृत्ती चौधरी (वय ३०) हा बाह्यस्त्रोत कर्मचारी वायरमन नदिम बादशहा काझी (वय ३१) यांच्यासह खिडकी वाडा डिपीवर सोमवारी काम करीत होते. तेव्हा रोशन इन्व्हर्टरचा बॅक करंट लागून खांबावरून खाली पडला. रोशन चौधरी यांच्या उजव्या हाताला जबर मार लागून हात फॅक्चर झाला असुन त्याचेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वीज पुरवठा खंडित असल्यावर सुद्धा इन्व्हर्टरचा बॅक करंट खांबावर येत असतो. सदर अपघात हा याच घटनेत झाला असून दैव बलवत्तर म्हणून तरुणाला केवळ दुखापत झाली, अशी माहिती नागरिकांकडून मिळाली.