जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील ज्येष्ठ उद्योजक व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे चेअरमन अशोक जैन व जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार सुरेश भोळे यांची जळगावच्या विकासासंदर्भात चर्चा झाली. यावेळी आमदार भोळे यांनी ‘व्हिजन डॉक्युमेंट २०२४-२०२९’ यावर चर्चा केली.
शहराचा कायापालट करण्यासाठी आ. भोळे यांनी येत्या पाच वर्षात करावयाची कामे संदर्भात अशोक जैन यांनी मार्गदर्शन केले. जैन हिल्स येथे झालेल्या या भेटीत सामाजिक, औद्योगिक, व्यावसायिक, दळण- वळण, पर्यावरण, शैक्षणिक, क्रीडा, ऊर्जा आदी विषयांवर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. ही भेट जळगावला वैभव प्राप्त करण्यासाठी निश्चित उपयुक्त ठरणार असल्याचे मत भोळे यांनी यावेळी व्यक्त केले.