ठिकठिकाणी महिलांकडून औक्षण करून उत्स्फूर्त प्रतिसाद
जामनेर (प्रतिनिधी ) महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार दिलीप खोडपे सर यांना जामनेर विधानसभा मतदार संघात गावागावांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उतसाही मतदारांनी त्यांना खांद्यावर उचलून प्रचार रॅली काढण्यात आली . दिलीप खोडपे सर यांचे महिला भगिनींनी त्यांचे औक्षण करून विजयी होण्याच्या शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना विजयाचे शुभाशीर्वाद दिले.
आज जामनेर विधानसभा मतदार संघातील नाथसागर ,सामरोद ,शंकरपुरा,नागानचौकी ,रामपूर,लहासर ,वाडेकिल्ला,सारगाव,टीघ्रा ,वडगाव, देवळास गाव, मोयखेडा दिगर, रांजणी ,गोरणाला ,कापूसवाडी , नांद्रा हवेली ,पळासखेडा काकर, देऊळगाव , आदी गावांमध्ये सकाळपासून दुपारपर्यंत दिलीप खोडपे यांच्या प्रचारार्थ रॅली उत्साहात काढण्यात आली. याप्रसंगी मोठा संख्येने नागरिक उपस्थित होते.