• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुक्ताईनगर मतदारसंघातील नकारात्मक चित्र बदलवण्यासाठी रोहिणीताईंना निवडून द्या – शरद पवार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 11, 2024
in Uncategorized
0
मुक्ताईनगर मतदारसंघातील नकारात्मक चित्र बदलवण्यासाठी रोहिणीताईंना निवडून द्या – शरद पवार

जाहीर सभेत महायुतीवर टीका

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : विधानसभा मतदासंघ निवडणुक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार ॲड. रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रिय कृषी मंत्री खा .शरदचंद्र पवार यांची जाहीर सभा मुक्ताईनगर येथे संपन्न झाली. यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे, आ. शिरीष चौधरी, शिवसेना उबाठा संपर्क प्रमुख परब, राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते रविंद्र पाटिल, माजी आमदार अरुण पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटिल, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार , डॉ जगदीश पाटील, महाविकास आघाडीच्या मुक्ताईनगरच्या उमेदवार ॲड. रोहिणी खडसे, भुसावळचे उमेदवार डॉ राजेश मानवतकर, रावेरचे उमेदवार ॲड . धनंजय चौधरी,आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी नेते उपस्थित होते.

यावेळी रविंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना, ॲड. रोहिणी खडसे या गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील जनतेच्या संपर्कात आहेत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले त्यांचा विजय निश्चित असल्याचे सांगुन ॲड.रोहिणी खडसे, डॉ.राजेश मानवतकर, ॲड. धनंजय चौधरी यांना विजयी करण्याचे उपस्थितांना आवाहन केले. यावेळी मार्गदर्शन करताना आ. एकनाथराव खडसे यांनी महायुतीच्या काळात महिला अत्याचारांचे प्रमाण वाढले, महागाई वाढली, तरुणांना रोजगार देणारे उद्योग इतर राज्यात पळवले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही हे चित्र बदलण्यासाठी महविकास आघाडीचे सरकार आणण्याचे त्यांनी जनतेला आवाहन केले.

यावेळी रोहिणी खडसे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना मागच्या निवडणुकीत अल्प मतांनी पराभव झाला तरी गेले पाच वर्ष सतत मतदारसंघातील जनतेच्या सेवेत राहिले प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न केला जनतेच्या, शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांचा प्रश्नांसाठी आंदोलने केली निवेदने दिली, जनसंवाद यात्रा काढून जनतेचे प्रश्न समस्या जाणून घेतल्या त्या सोडविण्याचा प्रयत्न केला त्यासाठी सर्वांची साथ लाभली ती कायम ठेवून आपल्याला मतदान करण्याचे रोहिणी खडसे यांनी जनतेला आवाहन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना शरदचंद्र पवार म्हणाले की, “महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करण्याचा विचार आम्ही करत आहोत आणि हे तुमच्या शिवाय शक्य नाही. नरेंद्र मोदी हे ४०० खासदार हवे तसे सांगत होते. तेवढे लागत नाही पण लोकांना शंका आली. यात काही काळबेरं दिसत आहे. मात्र ४०० जागा जोपर्यंत मिळत नाही. तोपर्यंत घटना बदलता येणार नाही अशी माहिती त्यांच्याच लोकांनी सांगितली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेत बदल करण्याचं यांच्या मनात पाप होतं. याबाबत लोकांमध्ये जागृती करण्यात आली. त्यासाठी सर्व एकत्र आले. इंडिया नावाची आघाडी काढली. सर्वांना एकत्र केलं, तुम्ही साथ दीली राज्यात एकतीस खासदार निवडून आले वाटेल ते करू मात्र घटना बदल करू देणार नाही,” असं शरद पवार म्हणाले.

राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत पण गेल्या अडीच वर्षात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेचा उपयोग केला गेला नाही कशासाठी सत्तेचा उपयोग केला गेला हे आपण बघितले. शेतकरी अडचणीत आला आहे गेल्या सहा सात महिन्यात राज्यात ८५६ शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या घटना घडल्या या आत्महत्या कर्जबाजारीपणातून झाल्या उद्योगपतींचे कर्ज केंद्र सरकारने माफ केले पण शेतकऱ्यांचे का केले नाही असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला. शिवरायांच्या या राज्यात गेल्या काही दिवसात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली , तरुणांच्या हाताला रोजगार नाही हे चित्र बदलायचे आहे त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ हवी आहे असे शरद पवार म्हणाले.


 

 

Previous Post

विचार वारसा फाउंडेशनतर्फे मतदान कार्ड वाटप सुरू

Next Post

विकास कार्याच्या बळावर माझा विजय नक्कीच : अमोल चिमणराव पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विकास कार्याच्या बळावर माझा विजय नक्कीच : अमोल चिमणराव पाटील

विकास कार्याच्या बळावर माझा विजय नक्कीच : अमोल चिमणराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon