• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शोषणमुक्त सशक्त समाजाची निर्मिती केवळ गांधी विचारधारेनेच शक्य – डॉ. अनिल काकोडकर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 10, 2024
in जळगाव, जैन कंपनी, भारत, विश्व
0
शोषणमुक्त सशक्त समाजाची निर्मिती केवळ गांधी विचारधारेनेच शक्य – डॉ. अनिल काकोडकर

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या नॅशनल गांधीयन लीडरशिप शिबिराचे उद्घाटन

जळगाव ( प्रतिनिधी ) – शोषणमुक्त समाजाची निर्मिती केवळ गांधी विचारधारेनेच शक्य आहे. कारण गांधी विचारधारेत अंत्योदयाचा विचार आहे. समाजातील वंचित, शोषीत व पीडित घटकांचा विचार आहे. ग्राम स्वराज सोबत सर्वांच्या सक्षमीकरणाचा विचार आहे. सध्याच्या ज्ञानयुगात प्रत्येकाच्या मनातील विश्वस्ताची भावना विकसित होण्यास पुरेसा वाव आहे, असे प्रतिपादन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या नॅशनल गांधीयन लीडरशिप शिबिर-२०२४ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर फाऊंडेशनचे विश्वस्त व जैन इरिगेशन सिस्टिम्सचे अध्यक्ष अशोक जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुदर्शन अय्यंगार, संस्थेच्या संशोधन विभागाच्या अधिष्ठाता डॉ. गीता धर्मपाल व ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई यांची उपस्थिती होती.

आपल्या मनोगतात डॉ. अनिल काकोडकर पुढे म्हणाले कि, समाजाची आर्थिक उन्नती होत असताना दिसत असले तरी सामाजिक समस्या संपलेल्या नाहीत. सामाजिक विषमता वाढतच आहे व तेच मानसिक अशांतीचे मूळ आहे. काही गोष्टी आम्ही मिळवल्या असल्यात तरी खूप काही गमावलेले आहे. त्यासाठीच येथे उपस्थित युवकांनी संकल्प करण्याची आवश्यकता आहे. आताचा काळ अनुकूल असून महात्मा गांधीजींना अपेक्षित असलेला अहिंसामुक्त, निर्भय भारत निर्माण करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. सहभागी शिबिरार्थींनी रघुपति राघव राजाराम भजन सादर केले. डॉ. गीता धर्मपाल यांनी प्रास्ताविकात गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई यांनी शिबिराची आवश्यकता प्रतिपादित करतांना देशासाठी वेळ देणाऱ्या तरुणांची गरज असल्याचे सांगितले. आपले जीवन समाजासाठी व देशासाठी असले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. समाजातील समस्यांना उत्तर शोधण्याची क्षमता युवकांमध्ये असून त्यासाठी बंडखोरवृत्ती वाढली पाहिजे असे ते म्हणाले. शिबिरातून जाण्यापूर्वी आपल्यातील अवगुण शोधून त्यांना दूर सारा, असेही त्यांनी सांगितले. डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी शुभेच्छा देताना समाजाप्रती कटिबद्ध होण्यासाठी सिद्ध व्हा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार नितीन चोपडा यांनी केले. या नॅशनल गांधीयन लीडरशिप शिबिरात भारताच्या १८ राज्यासह नेपाळमधील ६० शिबिरार्थी सहभागी झाले आहेत.

१२ दिवसीय या निवासी शिबिरात डॉ. सुदर्शन अय्यंगार यांची गांधी कथा, कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील यांचे ‘पदाशिवाय नेतृत्व’, ‘आपण आणि आपले संविधान’ विषयावर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, ‘आयुष्यासाठी शिक्षण’ विषयावर डॉ. गीता धर्मपाल, ‘युवक आणि नेतृत्व’ विषयावर दीपक मिश्रा, ‘नेतृत्वाचे उदाहरण’ विषयावर गिरीश कुलकर्णी, ‘चरखा आणि रेषा’ विषयावर भरत मूर्ती, ‘लवचिक समुदायाच्या दिशेने’ विषयावर कल्याण व शोबिता, ‘संघर्ष परिवर्तन व सामाजिक विश्लेषण’ विषयावर डॉ. अश्विन व डॉ. निर्मला झाला यांचे तर ‘गांधीजींचे तत्वज्ञान राजकारण व सत्याचे अनुसरण’ विषयावर बरुण मित्रा यांचे सत्र होणार आहे. तसेच महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल जैन यासह विविध मान्यवरांशी शिबिरार्थी संवाद साधणार आहेत. तसेच फराझ खान, कवी संदीप द्विवेदी, अतिन त्यागी यांचे विशेष सत्र होणार आहे. शिबिरात म्युझियम भेट, पीस वॉक, पीस गेम, विविध विषयांवर चर्चासत्र, भारत कि संतान, गोशाळा, शेती व नर्सरी काम इ. गोष्टी होणार आहेत.


 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtrahttps://kesariraj.com/shoshanmukt-sashkt-samaj-nirmiti/शोषणमुक्त सशक्त समाजाची निर्मिती केवळ गांधी विचारधारेनेच शक्य - डॉ. अनिल काकोडकर
Previous Post

लाडक्या बहिणींच्या ओवाळणीचे आशीर्वाद, कधीही विसरता येणार नाही” – गुलाबराव पाटील

Next Post

घरगुती गॅस खासगी वाहनात भरणाऱ्यावर कारवाई ; २० हजारांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

घरगुती गॅस खासगी वाहनात भरणाऱ्यावर कारवाई ; २० हजारांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून
1xbet russia

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून

September 15, 2026
गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून

September 15, 2026
गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon