• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गर्दीचा उच्चांक मोडीत मंगेश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 28, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गर्दीचा उच्चांक मोडीत मंगेश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मंत्री गिरीष महाजन, खा. वाघ यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीचे पदाधिकारी उपस्थित

चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव येथील आजवरच्या सर्व गर्दिचे उच्चांक मोडीत काढत भारतीय जनता पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांनी आज हजारो जनसमुदायाच्या साक्षीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याप्रसंगी राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिताताई वाघ, पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील, पाचोरा येथील आमदार किशोर पाटील, माजी आ. साहेबराव घोडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, शिवसेनेचे उमेश गुंजाळ, एकलव्य संघटनेचे अध्यक्ष पवनराजे सोनवणे, भाजपा जनजाती मोर्चाचे प्रदेश संयोजक किशोर काळकर, धनगर समाजाचे नेते नवनाथ ढगे, जिल्हा सरचिटणीस मधुबाऊ काटे यांच्यासह महायुतीचे जिल्ह्यातील व चाळीसगाव तालुक्यातील सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानावर सकाळी नऊ वाजल्यापासून शहर व तालुक्यातील कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली होती आणि बघता बघता ३० हजारांहून अधिक नागरिकांनी उपस्थित राहून ही नामांकन रॅली ऐतिहासिक बनवली. तालुकाभरातील शेकडो वारकरी आपल्या पोशाखात टाळ मृदंगासह उपस्थित होते तर लाडक्या बहिणी यांचीदेखील उपस्थीती हजारोंच्या संख्येत बघायला मिळाली. रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून होऊन सावरकर चौक, गणेश रोड, शिवाजी महाराज चौक मार्गे रेल्वे पुलावरून प्रशासकीय इमारत या ठिकाणी पोहोचल्यावर रॅलीचे विराट सभेत रुपांतर झाले होते. तत्पूर्वी आ. मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय रामराव जीभाऊ, राजमाता अहिल्यादेवी होळकर, शिवाजी घाटावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, संताजी जगनाडे महाराज यांचे स्मारक स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे जाऊन अभिवादन केले.

 

आ. मंगेश चव्हाण, प्रतिभाताई चव्हाण यांच्यासह संपूर्ण कुटुंब रॅलीत सहभागी झालेले यावेळी पहायला मिळाले. आकर्षक फुलांनी सजवलेल्या ट्रकवरुन आ. मंगेश चव्हाण यांनी सर्व जनतेला अभिवादन केले. चाळीसगाव शहरातील नागरिकांकडून या रॅलीचे ठिकठिकाणी उस्फुर्त स्वागत करण्यात आले तर ठिकठिकाणी सर्वसामान्य चाळीसगावकर व व्यापारी वर्गाकडून रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. आ. मंगेश चव्हाण यांची पक्षाने केलेली निवड अतिशय सार्थ ठरली असून पहिल्याच टर्म मध्ये त्यांनी केलेले विकास कामे निश्चितच प्रत्येक आमदाराला हेवा वाटावा असेच आहेत, विकासासाठी धडपड व विकास कामांसाठी मंत्रालयात टेबल टू टेबल फिरणारा आ. मंगेश चव्हाण होणे सोपे नसल्याची भावना राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे.

आ. चव्हाण यांच्या नामांकन रॅलीच्या सुरुवातीला तालुक्यातील विविध पक्षातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि कमळ हाती घेतले. यावेळी उपस्थित नेत्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत मंगेश चव्हाण यांनी केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला. एकंदरीत हि निवडणूक आता जनतेनेच हातात घेतल्याचे चित्र यावेळी निर्माण झाले होते. विधानसभा निवडणुकीसाठी चाळीसगाव मतदारसंघातून आमदार मंगेश चव्हाण हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी आमदार चव्हाण यांनी विठ्ठल रुक्माई स्वरूप म्हणजेच आई वडील यांचे आशीर्वाद घेतले. तसेच निवासस्थानी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला नमन करून चाळीसगावच्या विकासासाठी बळ व ऊर्जा मिळावी अशी प्रार्थना केली. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी तसेच लाडक्या बहिणींनी औक्षण केले.


 

 

Tags: #aa.mangesh chavan #arvind deshmukh news #dhudhsangh jalgaon #maharashra #bharat
Previous Post

जैन इरिगेशनच्या सहामाहिचे २,६६९.८ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न

Next Post

काँग्रेसचे धनंजय चौधरी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
काँग्रेसचे धनंजय चौधरी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

काँग्रेसचे धनंजय चौधरी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon