जळगाव तालुक्यातील आव्हाणा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील आव्हाणे येथे किरकोळ वादातून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना दिनांक २४ रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी परस्परविरोधी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.


घनशाम धनराज पाटील, सचिन घनशाम पाटील, प्रदीप घनशाम पाटील, तर दुसऱ्या गटाचे सोपान सुभाष पाटील, मुरलीधर शांताराम पाटील, कांतीलाल भावलाल पाटील, कैलास मंगल पाटील (सर्व रा. आव्हाणे, ता. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरकोळ कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची होऊन हाणामारी झाली. दोन्ही गटाकडील काही जण जखमी झाले. दोन्ही गुन्ह्यांचा तपास हवालदार अनिल फेगडे करीत आहेत.









