पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती
जळगाव (प्रतिनिधी) :- शिवसेनेचे नेते तथा जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे नेते गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व जळगांव विधानसभा क्षेत्रप्रमुख शाम कोगटा यांच्या मार्गदर्शनखाली आज जळगांव ग्रामीण मतदार संघातील आसोदा गावातील तरुणांनी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांची उपस्थिती होती. संजू कोळी, दीपक सपकाळे, विलास सोनवणे, सचिन माळी, सुनील कोळी, भीमराव माळी, मधू खंबायत, श्रावण कुभार, विलास बिऱ्हाडे, सुरेश माळी, किरण कुंभार, अनिल जयकर, कैलास कोळी, नाना कुंभार, ईश्वर कुंभार, जयंत नारखेडे, मधू महाराज, जगन कुंभार, निंबा पाटील, पुंडलिक माळी, प्रवीण कुंभार, सुकदेव बिऱ्हाडे, युवराज कोळी, बाळू चौधरी, रमेश बिऱ्हाडे, गलू भाऊ बिऱ्हाड, अनिल कुंभार, किशोर कुंभार, सुभाष माळी, वसंत माळी, देवानंद बिऱ्हाडे, बंटी सोनवणे, विनोद कोळी, देविदास चौधरी, सुनील चौधरी, रवींद्र कोळी, साहेबराव माळी यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.
यावेळी माजी नगरसेवक मनोज चौधरी, युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा, वैद्यकिय मदत कक्ष प्रमुख जितेंद्र गवळी, उप महानगर प्रमुख पवन ठाकूर, विशाल निकम, राहुल गवळी उपस्थित होते.