जळगाव — गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल जळगावच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच सायबर सुरक्षतेचे धडे घेतले.
विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी एक विशेष कार्यशाळा नुकतीच सपन्न झाली. या कार्यशाळेत सायबर गुन्हे, ऑनलाइन सुरक्षा आणि इंटरनेटचा जबाबदारीने वापर,ज्यामध्ये सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना विविध सायबर हल्ल्यांचे प्रकार, पासवर्डची सुरक्षा, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर याबद्दल माहिती दिली.
त्यांनी ऑनलाईन फसवणूक आणि गुप्तता धोके कसे टाळावे या विषयांवर मार्गदर्शन महाराष्ट्र सायबर सुरक्षा पोलीस सचिन सोनवणे यांनी केलेे.या सोबत तृप्ती अनपढे शाळेच्या प्राचार्य निलीमा चौधरी उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांच्या मनात सायबर सुरक्षा महत्त्वाचे असल्याचे ठसवण्यासाठी अनेक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
कार्यशाळेचे आयोजन शाळेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने केले होते, स्कूलच्या प्राचार्य सौ. नीलिमा चौधरी यांनी या कार्यशाळेचे महत्त्व अधोरेखित करत, डिजिटल युगात सायबर सुरक्षिततेविषयी जागरूकता वाढवणे हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले.शेवटी विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.