पहूर पोलीस स्टेशनची जळगाव रस्त्यावर कामगिरी
जामनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यात नाकाबंदीत धुळ्यातील संशयिताकडून विना परवानागी वाहतूक होणारी सव्वा लाख रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. तर कारसह एकूण ७ लाख ७५ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालक दिलीप अशोक पाटील (धुळे) यास पहूर पोलीस स्टेशनकडून अटक करण्यात आली.
पहूर हद्दीत पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी करण्यात आली होती. बुधवारी सायंकाळी पहूर-जळगाव रोडवर चारचाकी (एमएच २० ईई ३०९७) मध्ये १ लाख २५ हजार ४३० रुपये किमतीची दारू आढळल्याने ती जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सानप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस अंमलदार गोपाल गायकवाड, ज्ञानेश्वर ढाकरे, विनोद पाटील, हेमंत सोनवणे आदींच्या पथकाने केली.